डॉ.अमोल रामसिंग कोल्हे हे मराठीतील एक अभिनेते व राजकारणी आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'राजा शिवछत्रपती' या मालिकेपासून ते प्रसिद्ध झाले. तसेच 'स्वराज्यरक्षक संभाजी' या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमध्ये त्यांनी संभाजी महाराजांची भूमिका केली होती. २०१९ मध्ये ते शिरुर मतदारसंघातूनलोकसभेवर निवडून आलेत.
डॉ. अमोल कोल्हे यांचा जन्म पुण्याजवळील नारायणगाव येथे झाला. आठवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी तेथेच घेतले आणि मग पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. आपटे प्रशालेतून विज्ञान शाखेमधून त्यांनी १२वीपर्यंतचे शिक्षण घेतले. १०वी आणि १२वीच्या निकालांत त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश होता.
पुढे ते एम.बी.बी.एस.ची पदवी घेण्यासाठी मुंबईला गेले आणि त्यांनी सेठ गोवर्धनदास सुंदरदास (जी.एस.) महाविद्यालयातून त्यांनी आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.[१]
डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी डॉक्टर अाश्विनी या वैद्यकीय महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक आहेत.[२] io अमोल कोल्हे आधीपासूनच छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानतात.
स्वराज्याचे दूसरे अभिषिक्त छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचावा या साठी त्यांनी स्वतःचे घर विकुन स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेची निर्मिति केली. आणि संभाजी राजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत आणला
[३][४]
शीर्षक | वर्ष |
---|---|
अरे आव्वाज कुणाचा | २०१४ |
आघात | २०१० |
ऑन ड्युटी २४ तास | २०१० |
मराठी टायगर्स | २०१६ |
मुलगा | २००९ |
रंगकर्मी | २०१३ |
राजमाता जिजाऊ | २०११ |
राम माधव | २०१४ |
साहेब | २०१२ |
बोला अलख निरंजन | २०१७ |
डॉ.
अमोल कोल्हे हे पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते होते ते (२०१६ साली) पुण्याचे संपर्क प्रमुख होते. ते त्यांच्या आक्रमक भाषणशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत ते शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. त्यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि खासदार पदी निवड झाली.[१]
त्यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केेले.